वपु काळे यांचे २६+ विचार l v p kale quotes in marathi


पुरुषाचं लग्न झालं म्हणजे त्याला आई दुरावते आणि त्याला मूल झालं म्हणजे बायको दुरावते. - वपु काळे 

•━───────────────────────━•

वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते, प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. 
- वपु काळे 

•━───────────────────────━

मी तुला एक प्रश्न विचारणार आहे असे म्हटल्यावर सगळ्या चुकीच्या गोष्टी आठवतात
- वपु काळे 

•━───────────────────────━•


संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही. 
- वपु काळे 

•━───────────────────────━•

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

आयुष्य खुप साधे असतं. कधीकधी खुप रटाळ असतं. आयुष्याच महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडण. ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्येय आला पाहीजे.
- वपु काळे 

•━───────────────────────━•


आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड". कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात. पण लोखंडाच्या तारेहूनही मजबूत असतात. तुटले तर श्र्वासानेही तुटतील, नाहीतर वज्रघातानेही तुटणार नाहीत.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

वाचन तुम्हाला कायम तरूण ठेवतं; पण तिथही एकांताची गरज असते. वाचलेल्या पुस्तकाबद्दल आपण कुणाशी तरी बोलतो, तोव्हाच त्या पुस्तकाचं खरं वाचन सुरू होतं. 
- वपु काळे 

•━───────────────────────━•


आपत्ती पण अशी यावी कि, त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडुन पडायचचं तर ठेच लागुन पडु नये. चांगलं दोन हजार फुटांवरुन पडावं. माणुस किती उंचावार पोहोचला होता हे तरी जगाला समजेल.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस नक्की चांगला असणार, याची आशा सुटत नाही म्हणून आपण जगतो. उद्याबद्दलची काही ना काही स्वप्नं उराशी असतात म्हणून आज आपण मृत्यूला कवटाळावे असे वाटत नाही. 
- वपु काळे 

•━───────────────────────━•

श्रध्दा ही उघड्या डोळ्यांनी करावी हे पटले. मला असे वाटते कि ही श्रध्दाच माणसाला सशक्त बनवते. अपेक्षा न ठेवता केलेल्या श्रध्देचे फळ हे जास्त फलदायी, अधिक आनंद देणारे असते. 
- वपु काळे 

•━───────────────────────━•


मिठामुळे पदार्थाला चव येत असली तरी मीठ चवदार नसत. काही माणसे एकटी असतात अन् एकटी असतात तेव्हा बरणीतल्या मिठासारखी खारट असतात. पण ते जेव्हा दुसर्‍याच्या जीवनात मिसळतात तेव्हा त्यांच्या जीवनाची गोडी वाढवतात व आपल्या जीवनाला सार्थकता प्राप्त करून घेतात. 
- वपु काळे 

•━───────────────────────━•

विकायच ठरवीलं तर फुलेसुध्दा तराजुत टाकावी लागतात, विकणार्‍याने फुलांचं वजन विकाव, सुगंधवेडया माणसानं वजनात किती फुल येतात हे मोजू नये.  
- वपु काळे 

•━───────────────────────━•

लग्नात वराच्या खांद्यावर उपरण असते आणि त्याची गाठ वधुच्या पदराला बांधलेली असते. तो कधीही उपरण काढून फेकु शकतो पण तिला ते उपरण गाठी सहित सांभाळायच असत.
- वपु काळे

•━───────────────────────━•

एका क्षणात दृष्टीकोन बदलणं हे साधसुधं स्थित्यंतर नाही. जगातली सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणं. इतर गोष्टी केव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट उद्या फेकून देता येते. पण नवा विचार स्विकारणं ही खूप मोठी घटना आहे. आणि तो क्षण साजरा केलाच पाहिजे.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

आयुष्याचे calculation खूप वेळा केले, पण 'सुख दुःखाचे' accounts कधी जमलेच नाही.
जेंव्हा total झाली तेंव्हा समजले..की 'आठवण' सोडून काहीच balance उरत नाही.
- वपु काळे 

•━───────────────────────━•

बाहेरच्या जगात स्वतःचं नाणे खर असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं
- वपु काळे 

•━───────────────────────━•

एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत; आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण. 

•━───────────────────────━•

ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरूवु शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते. 

•━───────────────────────━•

खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो.

•━───────────────────────━•


आठवणी ह्या मुंग्याच्या वारूळाप्रमाणे 
असतात. वारूळात पाहून आतमध्ये किती
 मुंग्या असतील याचा अदमास होत नाही 
पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की 
एका मागोमाग एक अश्या असंख्य मुंग्या 
बाहेर पडतात. आठवणीचं ही तसचं असतं.

•━───────────────────────━•


प्रवासात हे असे डोंगराएवढे उंच, आकाशाइतके विशाल, वृक्षांसारके सावली देणारे, खळखळाट करीत झेपावणारे प्रपात पाहिले म्हणजे मला पैसा-प्रतिष्ठा, पद ह्यामागे धावणारा माणूस फार केविलवाणा वाटतो.

•━───────────────────────━•

सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकीट होते. 

•━───────────────────────━•

प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच. पळवाटा मूक्कामाला पोहचवत नाहीत. मूक्कामाला  पोहचवतात ते सरळ रस्तेच. 

•━───────────────────────━•