का जगायचं तुम्ही? स्व अस्तित्त्वाची ओळख ! (भाग्यलेखा कारंडे)

का जगायचं तुम्ही ?
     
           कधी कधी माणसाच्या हाताबाहेरची परिस्थिती होऊन जाते आणि वाटते , आयुष्याचा तो कर्दनकाळच आहे. म्हणावं तसे नशीब साथ देत नाही. आयुष्याच्या ठिणग्या अशाच उडत राहतात आणि आयुष्याचा प्रवास थांबवावा वाटतो. समोर तर कोणतीच गोष्ट दिसत नाही. मरणाच्या पलीकडे जाऊन स्व हिताचा माणूस कधीच शोध घेत नाही नाही. आपण हरलो आणि आणि हरणार हेच मनावर वाक्य बिंबवतो आणि आयुष्याचा the end करून टाकतो. परिस्थिती कितीही हाताबाहेर गेले तरी देव काही सर्वच दारे बंद करत नसतो. असल्या काल्पनिक गोष्टीवर कधीतरी विश्वास ठेवून थोडा धीर धरावा आणि परिस्थितीशी मिळते जुळते घेऊन तो कर्दनकाळ थोडा पुढे रेटावा लागतो ना ? की एकच पर्याय असतो तो आयुष्याचा the end येतात. आयुष्यात असे काही प्रसंग म्हणून काय life संपवून टाकायची का ? म्हणून काय जीवनाचा अंत करून घ्यायचा काय ? त्या अर्थहीन एवढ्या काळ जगण्याला काय किंमत आहे ? अस्तित्त्वाची खुमारी जगण्याला लावावीच लागते. 
            शेवटी आहेच की "आपला जन्म आणि मृत्यूचा खेळ" आता या काळात कोण किती वर चढतो , 'कोणाच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय' हे काही सांगता येणार नाही. म्हणतो ना; तरी आपलं नशीब आपल्याच हातात असते. असे म्हणतो खरे पण काही मर्यादित काळात स्वतःला नाही improve करू शकत आणि त्या परिस्थितीला तोंड देता देता नाकी नऊ येतात मग मेल्याहून मेल्यासारखे होते. आणि life मध्ये नकारात्मता वाढत जाते.  
           सकारात्मक गोष्टीकडे बघायला मनाची खंबीरी होत नाही आणि अखेर हरलेल्या व्यक्ती आत्महत्या या गोष्टीकडे वळतात. या गोष्टी कितपत योग्य आहे, याचा परिणाम स्वतः जग सोडून गेलो . म्हणून काहीच मागे उरत नसते. असे तर काहीच नसते त्यामागे बरीच माणसे संवादात येऊन गेलेली असतात. नाती-गोती यामध्ये स्वतःचा बराच कस बसलेला असतो. आई-वडील , बहीण, भाऊ, बायको, नवरा, प्रियेसी, प्रेमवीर मुले-बाळे अश्या कित्येक लोकांमधून कोणाचातरी तुमच्यावर जीव जडलेला असतो आणि आपण सरळ-सरळ मागचा पुढचा विचार न करता फक्त स्वतःचा विचार करतो आणि त्या स्टेजला स्वतःला संपवण्याइतपत स्वतःच्या मनाला देहाला कमकुवत बनवतो. हे योग्य आहे का ? नाही ना . मग मानसिक तयारी होत नाही. स्वतःच्या अस्तित्त्वाला काहीच अर्थ नाही का ?  
               इतर माणसे सोडली तर आपलंही काहीतरी देणं आहे. या पृथ्वीला, तिलाही नाही. तर स्वत:ला जित्याजगत्या देहाची काहीतरी इच्छा आकांक्षा असतेच ना. मग त्या जगण्याला काय अर्थ आहे म्हणा. आले-तसे गेलो म्हणायला लोक काय चार दिवस रडतील, पुन्हा त्यांचं आहे ते रुटिंग चालूच असतं. कोण गेलं काय? राहिलं काय? कोणाला कुणाच्या जाण्यावाचून काहीही फरक पडत नाही. ना कोणाची life तिथेच थांबत नाही. ना कोणी सोबत येत नाही. एक स्वतःच अस्तित्त्व निर्माण केल्या शिवाय या धरतीवरून काढता पाय घायचा नाही. येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचे. "कधीतरी थांबावं लागतं; काही काळ आपल्या हातात नसतो. म्हणून काय जगणे सोडून द्यायचे का ? नाही. या अश्या कुचकामी अर्थहीन जगण्याला काडीचीही किंमत नाही. कोणी कुत्रंही खात नाही. 
             स्वतः काहीतरी कमवलं तरच लोक तुमचा जयजयकार करतील. तुमच्यातील सुप्त अश्या अनेक गोष्टी असतात. त्या बाहेर काढणे खूप गरजेचे असते. तेच तर कळतं नाही. नाही सुप्त दडलेल्या अश्या बऱ्याच गोष्टीला मुकतो आणि नाही त्या गोष्टीच्या मागे धावतो त्या हरणासारखी गत करून बसतो. आपल्यातच कस्तुरी असते आणि काखेत कळसा गावाला वळसा अश्यातल्या गोष्टीत विलीन होऊन स्वतःला संपवतो. या अश्या बिनकामी जगण्याला आणि अनमोल अश्या देहाला लगेच त्या स्मशानात पोहचविणे कितपत बरे वाटते तुम्हीच सांगा.

वाटा सापडत जातील, तू शोधत जा....
जगणं तुला कळेल, तू जगत जा....

आयुष्य जगा, अनुभवा
येईल त्या परिस्थितीला तोंड द्या 
यश तुमच्याच हातात आहे
आणि आयुष्य किती जगायचं हेही 
तुमच्याच हातात आहे.....
हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला तोंड न देता 
थोडा वेळ जाऊ द्या धीर धरा... 
सगळं काही तुमच्या मनासारखं होऊन जाईल...
शेवटी आयुष्य आहे चालायचं...
प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायचं...
आणि स्वतःला सिद्ध करून दाखवायचं...


लेखिका - बी.एल.पी. कारंडे(भाग्यलेखा),सोलापूर