दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबात नाही. पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे.
- गौतम बुद्ध
जे स्वत: बलवान असूनही दुसऱ्यांचे अपराध सहन करतात त्यांनाच क्षमाशील म्हणतात.
- गौतम बुद्ध
माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे प्राणी मात्रांवर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.
- गौतम बुद्ध
दुसरे कोणीही तुम्हाला आनंदी वा दुःखी करू शकेल असा विचार करणेच हास्यास्पद आहे.
- गौतम बुद्ध
जो मनुष्य मनात उफाळलेल्या क्रोधाला वेगवान रथाला रोवाल्याप्रमाणे त्वरित आवर घालतो, त्यालाच मी खरा सारथी समजतो.
- गौतम बुद्ध
तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका.
- गौतम बुद्ध
आनंद मिळवण्याचा कोणताच मार्ग नाही. तर आनंद हाच सुखी होण्याचा मार्ग आहे.
- गौतम बुद्ध
सत्य पालन हाच धर्म आहे बाकी सर्व अधर्म आहेत.
- गौतम बुद्ध
एका मेणबत्तीने तुम्ही हजारो मेणबत्ती उजळू शकता. आनंदाचेही तसेच आहे. तुम्ही जितका आनंद वाटणार तितका तो वाढणार. आनंद हा वाटल्याने कधीच कमी होत नसतो.
- गौतम बुद्ध
नेहमी चांगला विचार करा. दुसऱ्यांबरोबर चांगले वागा. त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल.
- गौतम बुद्ध
आपल्या संचित पापांचा परिणाम म्हणजेच दु:ख होय.
- गौतम बुद्ध
तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात.
- गौतम बुद्ध
दुसऱ्यांच्या दु:खात भागीदार व्हावयास शिकणे हेच खरे शिक्षण आहे. - गौतम बुद्ध
पाण्याकडून हे शिका की जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका.
- गौतम बुद्ध