अब्दुल कलाम यांचे 12+ प्रेरणादायी विचार l Abdul Kalam quotes in marathi

जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वतः बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा. स्वतःला सिद्ध करा.


•━───────────────────────━•

आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. सर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे. पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. -  डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते, स्वतःचा शोध घ्यायला, नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधावा लागतो. 
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•
कोणाला हरवणं खूप सोपं; परंतु कोणाला
 जिंकण खूप कठीण असते. 
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील. कारण बॉस नावाचा प्राणी अजून तुमच्या आयुष्यात यायचा आहे.- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•
आयुष्य खडतर आहे त्याची सवय करुन घ्या.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

टीव्हीवरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्हीवरची सिरीयल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो. असते ते फक्त काम आणि काम.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

कॉलेजमधून बाहेर पडल्यावर लगेच पाचआकडी पगाराची अपेक्षा करू नका. कारण एका रात्रीत कोणी व्हाइस प्रेसिडेंट होत नाही त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

उत्तेजनार्थ हा प्रकार फक्तं शाळेत पहायला मिळतो काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते. खऱ्या जगात हरणाऱ्याला संधी देण्यास कोणीही तयार नसतो.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•


स्वप्न म्हणजे आपणाला झोपेत दिसते ते नव्हे तर स्वप्नं म्हणजे ते की जे आपणाला झोपू देत नाही.
 - अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे, आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे कोणाला दोष देऊ नका. झालेल्या चुकीपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•

तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी येवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तर ते तुम्हाला आता वाटतात. तुमचे संगोपन करण्यासाठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतले त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
- अब्दुल कलाम

•━───────────────────────━•


इंगजी शब्द end चा अर्थ शेवट नसून तो "Effort Never Dies" म्हणजेच प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर NO म्हणजे नाही चा अर्थ "Next Opportunity" असा होत जो नवीन संधी असा होतो. -
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम