संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधे असायला हवी.
- स्वामी विवेकानंद
वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हाच मार्ग आहे की तुम्ही सतत चांगला विचार करा.
बाहेरचे जग तसेच आहे जसा आपण विचार करतो. आपले विचारच गोष्टीला सुंदर किंवा कुरूप बनवतात.
सत्यासाठी काहीही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.
स्वतःला घडवण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे इतरांना दोष द्यायला तुम्हाला वेळ मिळणार नाही.
दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा नाहीतर तुम्ही जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवालं.
दुःखी माणसाच्या मदतीसाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेला जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त असतो.
समजदार व्यक्तीबरोबर काही वेळ केलेली चर्चा हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते.
स्वतःला परिस्थितीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतःचं स्वतःचे भाग्यविधाते आहात.
प्रत्येक चांगल्या गोष्टीची प्रथम चेष्टा होते मग विरोध आणि शेवटी स्वीकार होतो.
चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
- स्वामी विवेकानंद