लेखक - अन्सार शेख, lAS
प्रकाशन - unique academy publication.
पृष्ठसंख्या - २८०
वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मराठी माध्यम घेऊन आयएएस अधिकारी झालेल्या अन्सार शेख यांचे हे पुस्तक आहे. त्यांनी या पुस्तकातून upsc बद्दल सर्वकाही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जालनासारख्या मागास जिल्ह्यातील शेलगाव हे त्यांचे गाव आहे. एका छोट्या खेड्यातून जाऊन मोठा अधिकारी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. यामध्ये आर्थिक, सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो.
त्यांना अभ्यास करताना आलेल्या अडचणी, त्यांनी त्यावर कशी मात केली ? आपण काय करायला हवे ? काय चुका करू नये ? हे सर्व त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे. UPSC चा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचायलाच हवे.
Graduation झालं की बरेच जण म्हणतात की मी upsc, mpsc करणार आहे. परंतु त्यांना त्याबद्दल पूर्ण माहिती नसते. मग त्यांचे पहिले वर्ष तर परिक्षेबद्दल माहिती होण्यातच जाते. असे बऱ्याच जणांच्या बाबतीत घडते.
या पुस्तकातून अन्सार शेख यांनी upsc करणाऱ्या विद्यार्थ्यांना पडणाऱ्या खालील सर्वसामान्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.
🔰यूपीएससी का करायची ?
🔰 त्यांनी विश्लेषण करून प्रत्येक विषयाचे महत्त्व व त्यातील बारकावे सांगितले आहेत.
🔰प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा,
🔰कोणती पुस्तके वाचायची ?
🔰 वेळेचे योग्य व्यवस्थापन कसे करायचे m
🔰 कोणत्या गोष्टीची खबरदारी घ्यावी?
🔰 परीक्षेत प्रश्न कसे विचारले जातात ?
🔰लेखी परीक्षेबाबत सर्व माहिती.
🔰 निवड झाल्यानंतर मुलाखतीची तयारी कशी करायची ?
🔰 शेवटी ट्रेनिंगबद्दल सर्व माहिती दिली आहे.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी अतिशय उपयुक्त असे पुस्तक आहे. नक्की वाचा.