सर्व जग स्वार्थी आहे ! जपून रहा. (लेख)

 

          सर्व जग स्वार्थी आहे जपून रहा. या जगात कोणीही कोणाचे नसते. आधी माणसाला किंमत होती पण आता पैशाला किंमत आहे. ज्याच्याजवळ पैसै आहेत लोकं आपोआप त्याच्याकडे जातात. आणि एखाद्या गरीब माणसाला कोणी विचारत सुद्धा नाही. माणुसकीचा तर जणू अंतच झालाय.

आजची परिस्थिती अशी आहे की कागदाला (पैशांना) किंमत आहे पण माणसाला नाही.


         आपल्याकडे पैसै असेल तर आपले नातेवाईक, मित्र आपल्याला किंमत देतात. नसतील तर कोण जवळ सुद्धा येतं नाही. आणि आपल्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त पैसे असल्यावर जवळ येतात म्हणजे काय आपली त्यांना आपली खूप काळजी असते आपुलकी असते असेही नसते. पुढे कुठं तरी आपला कसा उपयोग करून घेता येईल एवढाच त्यांचा उद्देश असतो. आणि आपण जर एखाद्याला मदत केली तर तो ती लगेच विसरतो. पण त्याच वेळी मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवणार.

पैसा म्हणजेच सर्व काही नसतं. सर्व गोष्टी पैशांनी विकत घेता येत नसतात.

           मी आता पर्यंत फक्तं नातेवाईक आणि मित्रांबदलच सांगितलं. पण खरं तर आताच्या काळात बरेच आई आणि वडील ही स्वार्थी किंवा मतलबी आहेत असं म्हणल तरी चालेल. तुम्हाला हे चुकीचं वाटतं असेल पण तुम्हाला उदाहरणादखल पटवून देतो. आजकालच्या काळात बाई नोकरीला जाते म्हणून, काही स्त्रियांना त्रास नको असतो म्हणून सरोगसीचा मार्ग निवडतात. यात स्वार्थचं म्हणायचा ना ? 

मानल तर सर्व जगचं आपल आहे नाहीतर कोणीच नाही.

          मागच्या महिन्यात आमच्या घराशेजारी असणाऱ्या अनाथ आश्रमासमोर कोणीतरी एका लहान अपंग मुलाला सोडून गेले होते. ते निरागस मुल जन्मून काहीच दिवस झाले असतील. त्याच्या नशिबी कसले दुःख भोगायचे आले ? काय पाप केले असतील त्या मुलाने ? म्हणुन त्याच्या वाट्याला हे सर्व आले. आणि त्याच्या आईवडिलांना अशी काय एवढी मोठी अडचण आली होती की ते आपल्या मुलाला असे अनाथ आश्रमात जगायला सोडून गेले होते. हे फक्तं एक उदाहरण आहे. अनेक आश्रमात बरीच अशी मुल आहेत. ज्यांचे आई वडील जिवंत असताना सुद्धा जन्मतःच त्यांच्या वाट्याला हे दुःख आलं.

फक्तं जन्म दिला म्हणजे आई वडील झालं असं नसतं त्यासाठी मुलाचं संगोपन ही करावं लागत.

         जगात खूप माणसं अशी आहेत जी अपंग होती परंतु त्यांच्या आईवडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ती आज यशस्वी आहेत. ते आई वडील जगाला घाबरले नाहीत. बाकीचे काय म्हणतील याचा त्यांनी विचार केला नाही. मगं तुम्हाला काय होतय ? त्याची कमजोरी त्यांची ताकद बनवा व त्यांना सहाय्य करा. 

           म्हणजे काय मुलं स्वार्थी नसतात असं ही नाही उलट मी तर म्हणेन सर्वात जास्तं स्वार्थी कोण असेल तर ती मुलं. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला त्यांना म्हातारपणी त्रास देतात, घराबाहेर काढतात. 

          जर सर्वांनी प्रत्येक गोष्टीत स्वार्थ पाहिला तर जग स्वार्थी होणारच ना ! मी त्याला हे दिलं की तो मला ते देईल असा विचार करु नका. प्रत्येक गोष्ट स्वार्थासाठी करायची असते असं काही नसत. कधीतरी निःस्वार्थी पणाने काहीतरी काम किंवा मदत करून पहा. तो आनंद दुसरा कशातच मिळणारं नाही.