यश मिळवणं सोपं असतं का ? प्रेरणादायी लेख

          

         यश ! काहीजण म्हणतात यश मिळवणं खूप सोपं असतं तर काही जण म्हणतात खूप अवघड. मग नक्की यश मिळवणं सोपं असतं की अवघड ? जर सोपं असतं तर सर्वच जण यशस्वी झाले असते ना आणि जर अवघड असते तर कोणीच यशस्वी झाले नसते. ज्याचा त्याचा मानसिकतेवर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असते. जो यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतो दिवसरात्र धडपडतो आणि सफल होतो त्याला विचारले तर तो म्हणणार की यश मिळवणं सोपं आहे फक्तं प्रयत्न कमी पडू देऊ नका.
 
"यश मिळवणं सोपं नक्कीच नसतं परंतु अशक्य ही नसते."

             सर्वच जण पहीलच परंप्रयत्नांत यशस्वी होत नसतात. बरेच जणांच्या हाती अपयश येते. त्यातील बरेच जण मग असा विचार करतात की आपण हे करू शकत नाही व ते माघार घेतात. सर्वच अपयशी असे म्हणतीलचं असं नाही काही जण त्यांच्या प्रयत्न जरा कमी पडल्यामुळे अपयशी झालेले असतात ते पुन्हा नव्या उमेदीने प्रयत्न करुन यश मिळवतात. प्रश्न असतो तो जिद्द आणि चिकाटीचा जो कोण शेवटपर्यंत मैदानात टिकून जिंकण्याचा प्रयत्न करणार तो एक ना एक दिवस नक्कीच यश मिळवणारं. फक्तं शेवटपर्यंत चिकाटीने प्रयत्न करायला हवेत.

              कोणीही पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत नाही. त्याला खूप कष्ट करावे लागतात. प्रत्येकाला कोणत्या तरी क्षेत्रात जास्त आवड असते. जर करिअर साठीही त्याने तेच क्षेत्र निवडले तर अधिक सोईचे ठरते. व त्या क्षेत्रात तो यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. आणि त्यातील आवडीमुळे कामाचा कंटाळा येत नाही. त्यामुळे योग्य ध्येयाची निवड करा.


यश मिळवण्यासाठी आवश्यक असते ती जिद्द, चिकाटी, प्रयत्न करण्याची क्षमता.


यशस्वी लोकांबद्दल बाकीच्यांची मानसिकता :-

        काही लोकांना वाटतं की हे खूप सोपं होत मी सहज करू शकलो असतो. मग का केलं नाही ? आपल्याला बोलायला खूप सोपे वाटते पण एकादने ती गोष्ट पुर्ण करण्यासाठी किती कष्ट घेतलेले असतात ते त्याचं त्यालाच माहित असतात. जर एकदा व्यक्ती वेगळं नवीन काहीतरी करत असेल तर लोकं त्याला मदत करण्यापेक्षा आधी नावं ठेवतात. पण ज्यावेळी तो यशस्वी होतो त्यावेळी मात्र अभिमानानं सांगतात की हा माझा मित्र आहे, हा आमच्या गावातील आहे. माणूस ज्यावेळी यशस्वी होतो त्यावेळी सर्व जण त्याच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न करतात. आणि तेच लोकं आधी खूप नावं ठेवत असतात.


यश लगेच मिळतं नसतं त्यासाठी आधी दिवसरात्र मेहनत करावी लागते.