डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२+ विचार । dr. Babasaheb Ambedkar Quotes in marathi

जो पर्यंत तुम्ही सामाजिक स्वतंत्रता मिळवत नाही तोपर्यंत न्यायालयाने कितीही स्वतंत्रता दिली तरी ती तुमच्या काही कामाची नाही.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो.
 -  डॉ. बाबासाहेब आंबेडकर


माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये; लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. 
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

ज्या दिवशी मंदिरात जाणाऱ्या लोकांच्या रांगा ग्रंथालयात जाऊ लागतील त्या दिवशी भारत महासत्ता बनेल. 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. 
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आकाशातील ग्रह-तारे जर आपले भविष्य ठरवत असतील तर आपल्या मेंदूचा आणि मनगटाचा काय उपयोग ? 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

माणूस हा धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे. 
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वाचाल तर वाचाल. 
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवण्याच आहे अशी महत्वकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! 
-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

जो धर्म जनमापासूनच एकाद्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ बनवत असेल तर तो धर्म नाही तर गुलाम बनवायचे षडयंत्र आहे.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर