घर हरवलेली माणसं (वपु काळे) पुस्तक समीक्षा । Ghar harvleli mans book review in marathi


पुस्तक - घर हरवलेली माणसं 

लेखक - वसंत पुरुषोत्तम काळे

प्रकाशन - मेहता पब्लिशिंग हाऊस

पृष्ठसंख्या - २०४
 
              घर हरवलेली माणसं या कथासंग्रहात वपु काळे यांनी मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसांची व्यथा सांगितली आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरात राहायचं म्हणाल्यावर अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं सामान्य माणसांची यात खूप अडचण होते. हे सर्व वपु काळे यांनी काही कथांच्या माध्यमातून मांडले आहे.

           मुंबईत राहायचं म्हणाल्यावर छोटीसी खोली आली आणि भाडं मात्र जास्त. या छोट्याश्या खोतील बायको, मुल, आई वडील इ, मंडळी त्या छोट्या खोलीत राहायचं म्हणाल्यावर खूप अडचण येते. काही ठिकाणी छोट्या खोलीत मध्येच पडदा लावायची. आधीच घरात त्या कुटुंबाचीच राहायची अडचण होत असते आणि त्यातूनच एकदा पै पाहुणा आला तर मग तर अधिकच अडचण.अश्या अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं.
           
            काही ठिकाणी बऱ्याच छोट्या छोट्या खोल्यांमधील भाडेकरूंमध्ये एकच टॉयलेट असते. मग सकाळी त्यांची उडणारी तारांबळ. लोकांना सकाळी लवकर उठून रांगेत उभा राहायचा व आपला नंबर येण्याची वाट पाहायची. जर एखाद्या दिवशी उठायला उशीर झाला तर बाहेर लांबच लांब रांग लागलेली असायची मग त्यातून नंबर कधी यायचा. मग त्यादिवशी काम बुडले किंवा उशीर झालाच म्हणून समजा. मग अश्या ठिकाणी राहायचं म्हणाल की सामान्य माणसांची धांदल उडते. त्यात चांगल्या सोई सुविधा असणाऱ्या ठिकाणी राहायचं म्हणल्यावर परवडत नव्हते कारण पगार कमी.

           जर नवीन लग्न झालेलं जोडपं असेल तर त्यांना हवी तशी प्रायव्हसी मिळतं नाही. जर दुसरीकडे राहायला जायचं म्हणल तर परवडत नाही. अश्या शहरात राहणाऱ्या सामान्य माणसांच्या अनेक अडचणी लेखकांनी मांडल्या आहेत. आपल्याला सहजच वाटतं की बरेचं लोकं शहरात राहतात किती बरंय त्यांचं परंतु त्यांच्या व्यथा त्यांनाच माहित. सत्य परिस्थितीवर आधारित वेगवेगळ्या कथा या पुस्तकात आहेत. खुप सुंदर पुस्तकं आहे एकदा नक्की वाचा.