inspirational quotes in marathi । १८+ मराठी प्रेरणादायी विचार । प्रेरणादायी सुविचार

यश ही एक प्रक्रिया आहे. या प्रवासात कधी कधी तुमच्यावर दगडे फेकून मारली जातात आणि तुम्ही त्या दगडाना मैलाच्या दगडामध्ये रुपांतर करता.

जिवनात कितीही कठीण प्रंसग आले तरी तक्रार करु नका, कारण 'परमेश्वर' हा असा दिग्दर्शक आहे जो कठीण 'भूमिका' नेहमी उत्कृष्ट कलाकारला देतो.

दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वत: उन्हात उभं राहावं लागतं.

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.

संघर्षाशिवाय कधीच, काहीच नवे निर्माण होत नसते.

प्रयत्न करत रहा कारण सुरूवात नेहमी कठीणच असते.

जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.

अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.
 

अंधारचं नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरुवात करण्याची.

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याच हाताने कष्ठ करा व स्वत:चे भविष्य घडवा.

रस्ता नाही असे कधीही होत नाही,
रस्ता शोधायला अपयश येते हेचं खरे.

माणूस क्रांतिकारी म्हणून जन्माला येत नाही तो विचाराने क्रांतीकारी बनतो.

जे झालं त्याचा विचार करू नका;
 जे होणार आहे त्याचा विचार करा.

विचार करण्यासाठी वेळ द्या, 
कारण ते शक्तीचे उगमस्थान आहे.

गरूडा इतके उडता येत नाही, म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.