बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर ( पुस्तक समीक्षा ) l bangarvadi book review in marathi

पुस्तक - बनगरवाडी

लेखक - व्यंकटेश माडगूळकर

प्रकाशन -  मौज प्रकाशन गृह

 
             ग्रामीण भागातील जीवनावर आधारित ही कादंबरी आहे. लेखकांनी बाहेरच्या जगाशी काडीमात्र संबंध नसणाऱ्या धनगर समाजाची कथा रेखाटली आहे. कादंबरीचा नायक राजाराम विठ्ठल सौंदणीकर याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर बनगरवाडी येथे नवीन शिक्षक म्हणून नेमणूक होते. बनगरवाडी तस तीस पस्तीस झोपड्यांचे छोटेसे गाव होत. बनगरवाडीन त्यांना खूप काही नवीन शिकवलं.
  
           सुरुवातीला तिथं शाळा चालू करायचं म्हणल कोणीच मुल पाठवायला तयार नसतात पण तेथील कारभाराच्या मदतीने ते शक्य होते. मगं पुढं फक्तं सातवी पास झालेला तो मास्तर जबाबदारी कशी पेलतो याचे अत्यंत सुंदररित्या वर्णन केले आहे. मास्तरला लोकांचा विश्वास मिळवण्यासाठी अनेक दिव्यातून जावं लागतं. रामा बनगर मास्तरला बंद रूपयाची मोड आणायला सांगतो. मग मास्तरने मोड आणल्यावर विश्वासाने अजून जास्त मोड आणायला तो देतो. आणि ते पैसे चोरीला जातात. ते कोणी नेले असतील ? परत मिळतात का ? मास्तरवर याचा काय परिणाम होतो ? 

                 मास्तरांना पहिल्या दिवशी आल्यावर भेटलेला, शाळा चालू करण्यास मदत करणारा व तालीम चालू करण्यास मदत करणारा गावचा कारभारी, एका गावातून दुसऱ्या गावात भटकणारा व नंतर मास्तरान सोबतच राहणारा आयबु मुलाणी, मास्तरांवर विश्वास ठेवून बंद पडलेले रुपये बदलण्यास देणारा रामा, लहानसहान चोऱ्या करुन जगणारा व नंतर कबूल होणारा आनंदा रामोशी, टगेगिरी करणारा बालट्या, वय पार सरल असून नुसत वासावरून लांडगं आलेलं ओळखणारा काकोबा , मास्तरांचा आवडता विद्यार्थी ज्याने एकट्याने लांडगा मारला होता असा सता अशी अनेक पात्र लेखकांनी सुंदररित्या रंगवली आहेत.

        लोकांची पत्र पाठवन, तालुक्यावरून काही आणणं अशी छोटी- मोठी काम करून मास्तर लोकांचा कसा विश्वास संपादन करतात ?  पण मास्तरांच्या हातून असं काय घडत की येवढ्या दिवस कमावलेला विश्वास एकाच क्षणात जाण्याची वेळ येते ? मास्तरांना सता तालुक्याला शिकायला जावा असे वाटत होते पण त्याच्या अशिक्षित व कामचुकार बाप त्याला पाठवतो का ? गावात तालिम बांधून मास्तर राजांना उद्घाटनाला बोलवतात. तालिम बांधण्यासाठी लोकांना ते कसं तयार करतात ?मास्तरांना बनगरवाडीत जाऊन खूप काही नवीन शिकायला, अनुभवायला मिळाल.

         रोज सकाळी लवकर उठून मेंढ्या चारायला जायचं. दुपारी विहिरीवर अंघोळ करायची. व नंतर भाकरी खायची. आळीपाळीने एकाने मेंढ्यांवर ध्यान ठेवायचे व बाकीच्यांनी झोपायच व दिवस मावळतीला आल की पुन्हा मेंढ्यांना घेऊन घरचा रस्ता धरायचा. आल्यावर आपापल्या मेंढ्यांना बाजूला बोलवायचं. व सर्व मेंढर जुळली की भाकर खाऊन शाळेपसल्या झाडाखाली गप्पा मारायच्या व तिथंच झोपायच पुन्हा सकाळी उठून त्यांचा हाच दिनक्रम चालू. बाहेरच्या जगात काय चाललय याच्याशी जणू काही त्यांचं घेणं देणच नव्हतं. 

      फक्तं एक वर्ष पाऊस पडला नाही आणि बघता बघता बनगरवाडीत दुष्काळ पसरतो. मेंढ्यांना रोग होतो. त्या पटापट मारायला लागतात. उरलेल्या काही खायला राहिलेलं नसत. मग त्यांना घेऊन सर्व धनगर गाव सोडतात व पाण्याच्या शोधात निघून जातात. हळूहळू सर्व गावचं ओसाड पडते. धनगरांच्या आयुष्यावर लिहलेले हे पुस्तकं अतिशय सुंदर आहे. एका बैठकीत वाचण्यासारखं आहे. एकदा नक्की वाचा.

 अमेझॉन वरून खरेदी करा. 👇👇🛒🛒