जबाबदारी कविता । Responsibility poem in marathi


स्त्री म्हणाली पुरुषाला,
तुझ्यासाठी माझं घर सोडून येते
आणि हो आई - बाबांना सुद्धा

लग्न झाल्यावर मी घालते,
गळ्यात तुझ्या नावाचं मंगळसूत्र,
पायात  पैंजण अन् जोडवी

लग्न झाल्यावर मी लावते,
कपाळावर तुझ्या नावाचं कुंकू,
केसांत तुझ्या नावाचा सिंदुर

लग्न झाल्यावर मला तुझ्यासाठी
खूप काही परिधान करावं लागल
तसं तु माझ्यासाठी काय केलं ?

हे ऐकून पुरुष उत्तरला,
तुझी 'जबाबदारी'

तुझ आईचं पटेना झालं की
मी तुझी बाजू घ्यावी तर 
ठरतो 'जोरू का गुलाम'
आणि आईची घ्यावी तर
 ठरतो 'मां का लाडला'

स्त्री आणि पुरुष यांची नाही
करता येणारं तुलना
दोघांनाही करावा लागतो त्याग
एकमेकांना घ्यावं लागतं समजून 
तरच नात धरत टिकाव

© - Shiv

(All rights reserved. )