विष्णू सखाराम खांडेकर यांचे विचार । V. S. Khandekar quotes in marathi । वि. स. खांडेकर

मरणे आणि मारणे या दोन गोष्टी फार सोप्या आहेत. जगणे आणि जगवणे त्या मानने फार कठीण. मरायचेच असेल तर जगण्याचा प्रयत्न करताना, दुसऱ्याला जगवताना का मरू नये ?
- वि. स. खांडेकर

आयुष्याचा प्रत्येक क्षण जो लढत राहतो तोच खरा मनुष्य.
- वि. स. खांडेकर


सहानभुतीला नुसता जीभेचा ओलावा पुरत नाही, तिथं हृदयाचा ओलावाही असावा लागतो.
- वि. स. खांडेकर


सत्ता शिक्षा करु शकते. पण सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असतं.
- वि. स. खांडेकर.

आयुष्यात मोहाचे क्षण वारंवार येतात पण या क्षणांवर जे विजय मिळवतात तेच आपल्या आयुष्यावर सत्ता चालवू शकतात.
- वि. स. खांडेकर

समुद्र शिंपल्यात घालून कोणाचा दाखवता येईल का ? फुलाचं चित्र काढून त्याचा सुगंध कोणाला देता येईल का ? प्रितीची अनुभूतीेसुद्धा अगदी अशीच आहे.
- वि. स. खांडेकर



एका माणसाचा स्वभाव दुसऱ्याला कधी पुरतेपणी कळतो का ? छे ! आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृदयाचा ?
- वि. स. खांडेकर


मृत्यूच्या दारात राजासुद्धा भिकारी होतो.
- वि. स. खांडेकर

या जगात बऱ्या-वाईटाचे, खऱ्या-खोट्याचे, पाप-पुण्याचे साक्षीदार केवळ दोन आहेत. एक माणसाचा आत्मा आणि दुसरा सर्वसाक्षी परमेश्वर.
- वि. स. खांडेकर

लिंबाचे लोणचे मुरले की त्याला आंबट गोड रुची येते. आयुष्यातील जुन्या आठवणी पण अश्याच असतात.
- वि. स. खांडेकर.


फार दिवसांनी भेटलेल्या मित्रांच्या गप्पा रानातील पाऊलवाटांप्रमाणे असतात. त्या किती वळणे घेतील आणि कुठे जातील याचा काही नेम नसतो.
- वि. स. खांडेकर


माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते.
- वि. स. खांडेकर

कुठला ना कुठला छंद हे दुःखावरचे फार गुणकारी औषध आहे.
- वि. स. खांडेकर.

समाजाला कटू सत्य नकोय, सत्याचा गोड आभास हवा आहे. निती नकोय, नीतीचं नुसत प्रदर्शन हवंय.
- वि. स. खांडेकर


आपण सदैव आत्मकेंद्रित असतो नेहमी केवळ स्वतःच्याच सुख दुःखाचा विचार करतो त्यामुळे आपलं दुःख आपल्याला फार मोठं वाटत राहतं.
- वि. स. खांडेकर