सगळ्या जगाला माफ करायची ताकद फक्त आईमध्ये असते.
- सिंधुताई सपकाळ
दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो.
- सिंधुताई सपकाळ
माणूस कधीचं वाईट नसतो. माणसाच्या पोटाची भूक वाईट असते.
- सिंधुताई सपकाळ
मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतून मिळाला.
- सिंधुताई सपकाळ
जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे रहा, त्यामूळे संकटांची उंची कमी होईल.
- सिंधुताई सपकाळ
जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसेल तर इतरांसाठी जगायला शिका.
- सिंधुताई सपकाळ
माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं.
- सिंधुताई सपकाळ
दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणूसच समजू शकतो.
- सिंधुताई सपकाळ
मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळाले नसते. मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्याचे चटके पटकन कळाले.
- सिंधुताई सपकाळ
तुम्ही खूप मोठे व्हा परंतु मातीशी असलेले नाते कधीही विसरु नका.
- सिंधुताई सपकाळ