प्रविण हॉस्टेलवर राहत होता. तो मुंबईसारख्या शहरातून आला होता त्यामुळे तो इथल्या वातावरणात लवकर मिसळू शकला नाही. असच आलेला दिवस कसातरी ढकलायचा असं त्याचं काम चालू होता. त्याचे थोडेच मित्र झाले होते. तो जरा जास्तच सुशिक्षित असल्यामुळे तेथील मुलांमध्ये जास्त मिसळत नव्हता. असच बघता बघता सहा महिने संपले व सहामाही परीक्षा चालू होतात. काही दिवसांनी त्याची सहामाही परीक्षा संपते व तो सुट्टीसाठी मुंबईला जातो.
घरी आल्यावर प्रवीण सर्वांवर खुप चिडलेला असतो. तो सातारा सारखा ग्रामीण ठिकाणी शिकण्यासाठी पाठवलं म्हणून त्याच्या वडिलांशी भांडायचा. त्याने सांगून टाकलं की काही जरी झालं तर मी तिथे माघारी जाणार नाही माझ्यासाठी मुंबईत नाहीतर पुण्यात चांगले कॉलेज पाहा. त्याच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील ॲडमिशन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न करतात पण त्यांना अस सांगण्यात आल की अर्ध्या वर्षातून प्रवेश दिला जात नाही कमीत कमी हे वर्ष तर प्रवीणला सातारा येथेच काढावे लागणार. प्रवीणला हे समजल्यावर तो खूप नाराज होतो. व कॉलेजला जाण्यास नकार देतो.
त्याला खुश करण्यासाठी त्याचे वडील त्याच्यासाठी एक गिफ्ट आणतात ते पाहून तो खूप खुश होते. व कसाबसा सहा महिने सातारला काढण्यासाठी तयार होतो. आता सुट्टी संपलेली असते तो पुन्हा हॉस्टेलवर येतो पण हॉस्टेलवर आल्यापासून त्याच्या स्वभावात जरा बदल झालेला असतो. तो जरा पहिल्यापेक्षा जास्तच एकटा राहत असतो.
हॉटेलमधील रूम थोड्या लहानच होत्या एका रूममध्ये फक्त दोनच जण असायचे. तरीही सर्वात वरच्या मजल्यावरच्या दोन रूम शिल्लक होत्या. प्रविण हॉस्टेलच्या प्रमुखांना विचारून त्यातील एक खोली एकटसाठी घेतो. असं ही त्या खोल्या रिकाम्याच होत्या त्यांना वाटले याला एकट्याला अभ्यास करायचा असेल म्हणून ते ही होकार देतात. प्रविण त्या दोन्हीपैकी कोपऱ्यातील खोली घेतो. त्या खोलीला एक मोठी खिडकी असते. तिथून साताऱ्याचे विहंगम दृश्य दिसत असते. व जवळ नवीन झालेला मोबाईल टॉवर पण दिसे.
सुट्टीवरून परतल्यानंतर प्रविणच्या वागण्यात अचानक खूपच फरक जाणवू लागला. तो सतत काहीतरी विचार करत असायचा व मधूनच हसायचा. एवढंच नाही तर कधी कधी रात्री 12 - 1 वाजता त्याच्या खोलीतून हसण्याचा आवाज यायचा. मुलांना समजतं न्हवते की नक्की त्याला काय झालंय. हळूहळू सर्व जन म्हणायला लागली की त्याला भूतान पछाडले आहे. हॉस्टेलवर भूत आहे अश्या अफवा पसरल्या. सर्वजण प्रवीणला घाबरायचे व त्याच्यापासून दूर राहायचे पण हे त्याला न कळत म्हणे त्याला कळलं तो आपल्याला त्रास देईल.
प्रविणच्या खोलीच्या शेजारची खोली रिकामी होती व त्याच्या पलीकडच्या खोलीमध्ये रमेश व दिनेश राहत होते. त्यांना रात्री प्रविणचा आवाज ऐकून त्याची खुप भीती वाटायची. पण त्या रात्री अचानक त्यांच्या खोलीच्या दरवाजावर थाप पडते. दिनेश जागा होतो तो खूप घाबरलेला असतो तो रमेशला उठवतो. त्यांना प्रविणच भूत आल असं वाटतं असते त्यामुळे ते घाबरलेले असतात. कसंबस धैर्य एकवटून ते दरवाजा उघडतात व पाहतात तर काय खरंच प्रविण दारात उभा असतो. व तो त्यांना काहीतरी दाखवायचं असं म्हणून त्याच्या खोलीमध्ये बोलावतो व निघून जातो. आता खरा त्यांना प्रश्न पडतो काय करायचं ते त्याचा खोलीत जायचं का नाही. नाही गेलं तर तो आपल्याला त्रास देईल ह्या भीतीने ते त्याच्या खोलीमध्ये जातात.
आणि काय रोज फक्त प्रवीणच्या हसण्याचा आवाज यायचा आज त्यामध्ये आणखी दोन आवज वाढले होते. भयाण रात्री ते आवाज ऐकून एखाद्याचा काळजात धसssss करावं असं. आणि दुसऱ्या दिवसापासून ते दोघे प्रवीण सोबत दिसू लागले. आणि शाळेतील सुट्टीत वगैरे ते तिघे बाजूलाच बसलेले असायचे. व त्यांच्यात काहीतरी गूढ चर्चा चालू असायची व मधूनच ते हसायचे. व रात्री प्रविणच्या खोलीतून या तिघांचे गूढ आवाज यायचे. प्रविणने या दोघांना पछाडले अशी बातमी सर्व कॉलेज वर हळूहळू पसरू लागली. ही बातमी आता सर्व शिक्षकांबरोबर मुख्याध्यापकाना सुद्धा समजली होती.
दुसऱ्या शाळा सुटल्यावर मुख्याध्यापक सर्व शिक्षकांसमवेत हॉस्टेलवर येतात. शिक्षकांच्या ही मनात थोडी भीतीच असते. पण तरीही सर्वजण प्रविणच्या खोलीकडे जाऊ लागतात. खोलीबाहेर आल्यावर ते दारावर टकटक करतात. थोड्याच वेळात प्रविण दरवाजा उघडतो. आत तिघेही असतात. ते सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना पाहून आश्चर्यचकित होतात. शिक्षकांना त्यांच्याकडे पाहून तरी काही भुताटकीची लक्षणे वाटतं नसतात. अखेर धीर करून राठी सर त्या हसण्याचा प्रकाराबद्दल व भुताटकीबद्दल प्रवीणला विचारतात. प्रवीणला सुरुवातीला सर असं का विचारयेत ते समजत नाही रमेशच्या लगेच लक्षात येते व तो प्रवीणला सांगतो. मग तो प्रकार त्या तिघांच्याही लक्षात आलेला असतो.
मग प्रविणचं सरांना सांगायला लागतो, तो या सुट्टीत घरी गेलेला असतो तेव्हा त्याला हॉस्टेलवर करमत नाही म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला मोबाईल गिफ्ट दिला होता. त्याला खालच्या खोलीमध्ये रेंज येत न्हवती म्हणून तो हॉस्टेल प्रमुखांना विचारून सर्वात वरच्या मजल्यावरची कोपऱ्यातील खोली घेतो. त्या खोलीला मोठी खिडकी होती. तिथून मोबईलला चांगली रेंज येत होती. आणि तो WhatsApp वरचे वगैरे जोक्स वाचून एकटाच हसायचा. हळुहळु त्याला एकट्याला जरा बोर व्हायला लागतं तेव्हा तो रमेश व दिनेशला बोलावतो व त्यांना मोबाईल दाखवतो. त्यांना तो कशामुळे हसतोय ते समजलं होत आणि त्यांना आपण भलताच विचार करून घाबरलो याच हसू येत होतं. ते त्या वेळीच सर्वांना सांगणार होते. पण मोबईलबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही असं प्रविणने त्यांना ताकीद दिली होती. या अटीवरच तो त्यांनाही मोबाईल पाहू देत होता. त्यामुळं त्या दोघांनी कोणालाही सांगितलं न्हवत. आता सर्वाना भुुताबद्दल कळून चुकलं होत. आपण भलताच काही तरी विचार करत होतो हे पाहून सर्वांंना हसू आलं.
आणि अश्या रीतीने हॉस्टेलवरच्या भुताचा अंत झाला. आणि थोड्याच दिवसात प्रविणचं वर्षही संपलं व त्याला हवं असलेलं कॉलेज त्याला मिळालं.
© - marathisahitya.in
( All rights reserved l Don't copy from here )