तुमच्या कृतीचे काय परिणाम होतील हे तुम्हाला कृती करण्याआधी कधीच कळणार नाही.
पण तुम्ही काहीच केले नाहीत, तर त्यातून काही निष्पन्नही होणार नाही.
- महात्मा गांधी
कमजोर कधीही क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.
– महात्मा गांधी
तुम्ही जे काम कराल ते महत्त्वाचं असू शकतं; पण तुम्ही काहीतरी काम करणं, हे सर्वात महत्त्वाचं असतं.
- महात्मा गांधी
रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल, पण ह्रदय हवे. ह्रदयाशिवाय आलेले शब्द मात्र नकोत. - महात्मा गांधी
असं जगा की उद्या तुम्ही मरणार आहात आणि असं शिका की तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे.
- महात्मा गांधी
एखादा देश आणि त्याची नैतिक मुल्ये किती महान आहेत हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक देतात त्यावरूनही कळून येते.
- महात्मा गांधी
एखाद्या देशाची संस्कृती तेथील रहिवाशांच्या हृदयात आणि आत्म्यात वसलेली असते.
- महात्मा गांधी
‘डोळ्याच्या बदल्यात डोळा’ या तत्वज्ञानाने जग तेवढे आंधळे होईल.
- महात्मा गांधी
तुम्ही मला कैद करू शकता, माझा छळ करू शकता, माझे शरीर नष्ट करू शकता. पण माझ्या मनाला कैद करू शकणार नाहीत.
- महात्मा गांधी
मनाला उचित विचारांची सवय लागली कि उचित कृती आपोआप घडते.
- महात्मा गांधी