निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू ।
॥ श्रीमंतयोगी ॥
। मावळा आहे शिवछत्रपतींचा ।
। या वाटेवर थकणार नाही ।
। परंपराच आहे आमची ।
। मोडेन पण वाकणार नाही ।
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी…!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता !
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता !
शिवराय सांगायला सोपे आहेत,
शिवराय ऐकायला सोपे आहेत,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे,
पण शिवराय अंगीकारणे खूप कठीण आहे..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की!
सिंहाची चाल, गरुडा ची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन !
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
ही शिवाजी महाराजांची शिकवण !
शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का ?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी !
अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे..
विजे सारखी तलवार चालवुन गेला !
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला !
मुठभर मावळ्याना घेऊन
हजारो सैतानांना नडुन गेला !
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला !
जगावे तर वाघासारखे,
लढावे तर शिवरायांसारखे….