Friendship Quotes in Marathi l मैत्री मराठी चारोळ्या l maitri quotes l दोस्ती


जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते, ती म्हणजे मैञी असते.

मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.



रक्ताची नाती जन्माने मिळतात. 
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.

हे नक्की वाचा :

मराठी प्रेरणादायी विचार l Marathi Motivational quotes


चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात फरक इतकाच की, औषधांना एक्स्पायरी डेट असते पण मैत्रीला नाही.

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,
एकत्र नसलो तरी कायम सुगंध दरवळत राहील,
आपण कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते, 
आज आहे तसेच उद्या राहील.

मैत्रीचा फायदा काय आहे ?
जिथे फायदा असतो तिथे मैत्री कधीचं नसते.

जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री...

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे.

शिंपल्यात पाणी घालुन समुद्र कधी दाखवता येत नाही, 
हाताने काढलेल्या फुलाला सुगंध कधी येत नाही,
निळयाभोर गगनाचा अंत कधी होत नाही,
अन नाजुक अशा मैत्रीचा उल्लेख शब्दात करता येत नाही.


मैत्री हे मनाचे बंधन असते हे नाते सर्व नात्याहून वेगळे असते दूर असले तरी काही फरक पडत नाही मित्रांची जागा तर कायमची मनात असते.


मैत्री म्हणजे फळ नसते ....पिकायला,
 मैत्री म्हणजे फांदी नसते ....तुटायला,
 मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना आधार द्यायला.

जीवनात दोनच मित्र कमवा एक श्रीकृष्ण सारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हाला विजयी करेल.
 आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल.

दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्त्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्त्वाचं आहे.