मातृदिन शुभेच्छा । Mothers day wishes । Mothers day Quotes । मातृदिन शायरी संदेश । Mothers day wishes in Marathi । Best Mother's day wishes । Happy Mother's Day

एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते 
आई तू आहेस म्हणूनच मी आत्मविश्वासाने जगू शकते – Happy Mothers Day



तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी 
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


जगात असे एकच न्यायालय आहे, 
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
मातृदिनाच्या शुभेच्छा !



डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते 
…मातृदिन शुभेच्छा



हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मला तूच हवीस….हॅप्पी मदर्स डे आई!


देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला
माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….मातृदिन शुभेच्छा

ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”

मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!


आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही…
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही 
Happy Mothers Day



मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही.
पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस 



हजार जन्म गेले तरी,
या एका जन्माचे ऋण कधीच फिटणार नाही,
आई लाख चुका होतील माझ्याकडून,
पण तुझं समजावणं काही मिटणार नाही, मातृदिनाच्या शुभेच्छा !



आई…… लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते ,
आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही उरतही नाही..!
मदर्स डे च्या शुभेच्छा



आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका
 

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम
आणि उत्तुंग माया,
उत्साह आणि आपलेपणा…
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!



‘आ’ म्हणजे आत्मा…
आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..
आई तुला तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा !



आई म्हणजे स्वर्ग,
आई म्हणजे सर्व काही…
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही.
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!