महाराष्ट्रात अष्टविनायक दर्शनासाठी खूप लोक येत असतात. त्यांचा महीमा अनन्यसाधारण आहे. अष्टविनायकांपैकी पाच गणपती हे पुणे जिल्ह्यात आहेत.
हे मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित आहे व पुणे शहरापासून 65 कि मी अंतरावर आहे. अष्टविनायक दर्शनाची सुरुवात येथूनच केली जाते. या मंदिरात प्रवेश करण्यासाठी चार प्रवेशद्वारे आहेत व ती चार युगांची प्रतीके मानली जातात.
2) चिंतामणी - थेऊर
हे मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर पुणे शहरापासून फक्त 25 km अंतरावर आहे. हे खूप पुरातन मंदिर आहे व पेशव्यांद्वारे त्याचा जीर्णोद्धार केला गेला. असे म्हणतात हा गणपति सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो व चिंतामुक्त करतो.
3) सिद्धिविनायक - सिद्धटेक
हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर अहमदनगर शहरापासून 85km तर पुणे शहरापासून 100km अंतरावर आहे. असे म्हणले जाते की सर्वप्रथम या मंदिराची स्थापना श्री विष्णूनीं केली होती व नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला.
4) महागणपती - रांजणगाव
हे मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर पुणे शहरापासून 50 km अंतरावर आहे. ह्या मंदिराचे बांधकाम पेशवे काळात करण्यात आले आहे. नवसाला पावणारा म्हणून ह्या गणपतीची ख्याती आहे.
5) विघ्नेश्वर - ओझर
हे मंदिर पुण्यापासून 85 km अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नसुर नावाच्या राक्षसाचा अंत केला होता म्हणून त्याला विघ्नेश्वर या नावाने ओळखले जाते. हा गणपती विघ्नहर्ता म्हणजे सर्व विघ्ने दूर करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. येथून लेण्याद्री फक्त 20km अंतरावर आहे.
6) गिरिजात्मक - लेण्याद्री
हे मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर पुणे शहरापासून 100km अंतरावर आहे. हे मंदिर लेण्यांमध्ये स्थित आहे. पुत्र प्राप्ती साठी पार्वतीने येथे तप केले होते व मग गणेशाचा जन्म झाला. पार्वतीला गिरिजा असेही म्हणतात व आत्मज म्हणजे पुत्र त्यामुळे या गणपतीला गिरिजात्मक असे नाव पडले.
7) वरद विनायक - महड
हे मंदिर रायगड जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर मुंबईपासून 67 km तर पुण्यापासून 85 km अंतरावर आहे. ह्या मंदिराची स्थापना सतराव्या शतकात पेशव्यांद्वारे करण्यात आली. येथून लोणावळा हिलस्टेशन जवळच आहे.
8) बल्लाळेश्वर - पाली
हे मंदिर रायगड जिल्ह्यात स्थित आहे. हे मंदिर मुंबई शहरापासून 105km तर पुणे शहरापासून 115 km अंतरावर आहे. हे एकमात्र असे गणपति मंदिर आहे जे भक्ताच्या नावाने ओळखले जाते बल्लाळ नावाच्या भक्तामुळे या गणपतीला बल्लाळेश्वर असे नाव पडले. या मंदिराच्या जवळूनच अंबा नदी वाहते तसेच दुसऱ्या बाजूला सरसगड किल्ला आहे.