मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले,
वाजत गाजत बाप्पा आले
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रावण सरला, भाद्रपद आला
चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
आजपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
वक्रतुण्ड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा
गणपती तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करोत.., तुम्हाला सुख समृद्धि, भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना....
बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरुन…
गणपती बाप्पा मोरया,
मंगल मूर्ती मोरया…
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.