कामक्रोध विंचू चावला |
तम घाम अंगासी आला ||धृ||
पंचप्राण व्याकुळ झाला |
त्याने माझा प्राण चालिला |
सर्वांगाचा दाह झाला ||१||
मनुष्य इंगळी अति दारुण |
मज नांगा मारिला तिनें |
सर्वांगीं वेदना जाण | त्या इंगळीची ||२||
ह्या विंचवाला उतारा |
तमोगुण मागे सारा |
सत्त्वगुण लावा अंगारा |
विंचू इंगळी उतरे झरझरां ||३||
सत्त्व उतारा देऊन |
अवघा सारिला तमोगुण |
किंचित् राहिली फुणफुण |
शांत केली जनार्दनें ||४||
श्रीसकलसंतगाथा खंड दुसरा
श्री एकनाथ महाराजांचे अभंग क्र - ३७९०