व्यर्थचि ते गेली भावना हो ||१||
यालागी वोळखी असावी नेटकी ।
येईल परिपाकी गुण तया ॥२॥
साखरेचा खडा गार ते एकवर्ण ।
हंस पक्षी जाण सारिखेची ||३||
बहेणि म्हणे पाहे विचारूनी मनी ।
ज्ञान सर्वांहूनी श्रेष्ठ असे ||४||
हिंगाचिया संगे कापूर नासला ।
लवणे विध्वंसिला क्षीरयोग ||१||
म्हणोनिया संग करावा तो करी ।
जो हो सौख्यकारी प्राणियाते ||२||
केशर काजळासी संगत जालिया ।
काजळाचा तया संग लागे ||३||
बहेणि म्हणे संग धरावा तो ऐसा ।
मोक्ष तो आपैसा होय जेणे ॥४॥
(संत बहेणाबाईंची गाथा अभंग क्र. २५५ व ३१५)
अश्या प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले WhatsApp Channel जॉईन करा.
👇👇